Tuesday, 23 August 2016

23 AUG HISTORY TODAY

हा या वर्षातील २३५ वा (लीप वर्षातील २३६ वा) दिवस आहे.
       हत्ती, घोड्यांच्या तुलनेत ऊंट सांभाळणे तसे सोपे असते. कारण ऊंट हा अतिशय गरीब प्राणी आहे. तो फार क्‍वचित चिडतो. त्याला सांभाळणे इतके सोपे असते, की एकटा मनुष्य आठ-दहा ऊंटांच्या नाकात एकच बारीक दोरी अडकवून दूरवर सफर करू शकतो.ऊंटांचा काफिला

महत्त्वाच्या घटना:

२०१२:राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार!
२०११:लीबीयातील हुकुमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता उलथण्यात आली.
२००५:कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान
१९९७:हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९०:आर्मेनियाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९६६:‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
१९४२:दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू
१९४२:मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९१४:पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८३९:युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७३:मलाईका अरोरा - खान – मॉडेल व अभिनेत्री
१९५१:नूर – जॉर्डनची राणी
१९४४:सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री
१९१८:गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्‍च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हेसुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत. विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. (मृत्यू: १४ मार्च २०१०)
१७५४:लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: २१ जानेवारी १७९३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४:आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर१९४०)
१९७५:पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते. १९३२ मध्ये त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. (जन्म: २२ जुलै १८९८)
१९७४:डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)
१९७१:रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (जन्म: २४ जानेवारी १९२४)
१८०६:चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १७३६)
  ६३४:अबू बकर – अरब खलिफा (जन्म: ? ? ५७३)

Today in Indian History
Events for August 23
23-August-1573Akbar left for Agra when he received the report of widespread rebellion. He arrived in Ahmedabad by forced marches on the eleventh day.
23-August-1872Tanguturi Prakasam, great lawyer, journalist, nationalist, politician, leader, social reformer and former chief minister of Andhra Pradesh, was born at Kanuparthi village in Ongole district in Andhra Pradesh.
23-August-1933Mahatma Gandhi was released from government detention in the Poona Civil Hospital after doctors warned that his fast was endangering his life. Gandhi, who undertook the fast eight days ago in protest over being arrested again by British authorities, weighed 90 pounds at the time of his release. There was considerable speculation over what the nationalist leader would do upon regaining his strength, but the common assumption was that he would be arrested again by the British authorities if he resumed his civil disobedience.
23-August-1942Gorabai Katiya, freedom fighter, was shot by police while participating in a procession for freedom movement in Narsihapur.
23-August-1947Sardar Vallabhbhai Patel was sworn is as the Deputy Prime Minister of India.
23-August-1958Marathwada University was started.
23-August-1986B. G. Deshmukh was appointed as the Cabinet Secretary of India. He held this office till 27th March, 1989.
23-August-1989Pandit Krishnarao Shankarrao, great singer of 'Gwalher Gharana', passed away.
23-August-1994Former prime minister Mian Nawaz Sharif said that Pakistan possessed a nuclear bomb and warned that an attack by India could start a nuclear war in Pakistan.
23-August-1994Arati Gupta (Saha) succumbed to an incurable jaundice. (29-9-99).
23-August-1995First ever cellular phone service begins in Calcutta.
23-August-2000India, Japan unveil new global partnership and agree to start a formal security dialogue. Sanctions status quo on CTBT.
23-August-2000Pronindranath Rangarajan Kumaramangalam, Union Power Minister, dies of a massive heart attack at the AIIMS, New Delhi.














No comments:

Post a Comment