20 AUG HISTORY TODAY
२० ऑगस्ट दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | २० ऑगस्ट २०१४
२० ऑगस्ट दिनविशेष(August 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
नरेंद्र अच्युत दाभोलकर - (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ - ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- ६३६ : यार्मूकची लढाई. खालिद इब्ल अल-वालिदच्या नेतृत्त्वाखाली अरबांनी सिरिया व पॅलेस्टाइन जिंकले.
- १००० : सेंट स्टीवनने हंगेरीचे राष्ट्र स्थापन केले.
- १७७५ : स्पेनने तुसॉन, अॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.
- १७९४ : अमेरिकेच्या सैन्याने शॉनी, मिंगो, डेलावेर, व्यांडोट, मायामी, ऑटावा, चिप्पेवा आणि पोटावाटोमी जमातींचा पराभव केला.
- १८६६ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॉन्सनने अमेरिकन यादवी युद्ध अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर केले.
- १८८२ : पीटर इलिच त्चैकोव्सकीचे १८१२ ओव्हर्चर हे संगीत पहिल्यांदा मॉस्कोमध्ये वाजवले गेले.
- १८८५ : इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना.
- १९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.
- १९१४ : पहिले महायुद्ध - जर्मनीने ब्रसेल्स काबीज केले.
- १९२० : नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना.
- १९२६ : जपान मध्ये निप्पॉन होसो क्योकैची स्थापना.
- १९४४ : दुसरे महायुद्ध - रोमेनियाची लढाई सुरू.
- १९५३ : सोवियेत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.
- १९५५ : मोरोक्कोमध्ये ऍटलास पर्वतातून आलेल्या बर्बर सैनिकांनी ७७ फ्रेंच नागरिकांना ठार केले.
- १९६० : सेनेगालने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- १९६८ : २ लाख सैनिक व ५,००० रणगाड्यांसह सोवियेत संघ व इतर राष्ट्रांनी चेकोस्लोव्हेकियावर चढाई केली.
- १९७५ : व्हायकिंग १चे प्रक्षेपण.
- १९७७ : व्हॉयेजर १चे प्रक्षेपण.
- १९८६ : एडमंड, ओक्लाहोमा येथे पोस्टाच्या कर्मचारी पॅट्रिक शेरिलने आपल्या १४ सहकर्मचार्यांची हत्या करून स्वतःला मारुन घेतले.
- १९८८ : इराण-इराक युद्ध - आठ वर्षे चाललेल्या लढायांनंतर युद्धबंदी कायम.
- १९९१ : एस्टोनियाने स्वतःला सोवियेत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.
- १९९७ : सूहाने हत्याकांड - अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण.
- १९९८ : ऑगस्ट ७ रोजी केन्या व टांझानियातील आपल्या वकीलातींवर झालेल्या हल्याचा वचपा म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या इमारतींवर क्रुझ प्रक्षेपणास्त्रांनी हल्ला केला. याच वेळी सुदानमध्येही हल्ला करण्यात आला.
- २००८ : स्पानएर फ्लाइट ५०२२ हे माद्रिद पासून ग्रान केनेरियाला निघालेले विमान माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. १५३ ठार. १८ बचावले.
- २००८ : भारताचा खेळाडू सुशीलकुमार याला बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती या प्रकारात ब्रॉंझ पदक मिळाले.
जन्म, वाढदिवस
- १७७९ : जोन्स जेकब बर्झेलियस, स्विस रसायनशास्त्रज्ञ.
- १८३३ : बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष.
- १९०१ : साल्वातोरे क्वासिमोदो, नोबेल पारितोषिक विजेता इटालियन लेखक.
- १९३७ : प्रतिभा रानडे, कथा - कादंबरीकार.
- १९४१ : स्लोबोदान मिलोसेविच, सर्बिया आणि युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४४ : राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान.
- १९४६ : एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १९८४ : पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८४ : जादुगार रघुवीर, पुण्याची व महाराष्ट्राची किर्ती जगभर पसरवणारे प्रसिद्ध जादुगार.
- १९९७ : प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
- १९९१ : गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.
- २००१ : फ्रेड हॉयल, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
- २०१३ : नरेंद्र दाभोलकर, बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष.
- २०१३ : ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर, कालनिर्णय दिनदर्शिकेचे सर्वेसर्वा.
NASA tests the most powerful rocket booster in history
श्रीकृष्ण जन्माष्टमी
अर्जुनाचे निमित्त करून उभ्या मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांना गीतामृत पाजणारा तो हा कृष्णच...
- नवीन लेखन
- वाचकांची आवड
- संपादकांची आवड
उपयुक्त दुवे
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१६ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१६ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment