Friday, 19 August 2016

8 AUG HISTORY TODAY

८ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१३
८ ऑगस्ट दिनविशेष(August 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
दादा कोंडके - कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.

जागतिक दिवस


  • पितृ दिन : तैवान (मँडेरिन भाषेत बा बा या शब्दांचा अर्थ वडील असा होतो!)

ठळक घटना, घडामोडी


  • १५०९ : सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
  • १७८६ : जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉँत ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.
  • १८६३ : गेटिसबर्गच्या लढाईत हार पत्करल्यावर दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा दिला(जो अस्वीकृत झाला).
  • १९१८ : पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई - दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेत ६ जर्मन व्यक्तींना हेर असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड.
  • १९४२ : चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला.
  • १९४५ : सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.
  • १९४९ : भुतानच्या राष्ट्राची स्थापना.
  • १९६३ : इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले.
  • १९७४ : वॉटरगेट कुभांड - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा जाहीर केला.
  • १९८८ : म्यानमारच्या राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.

जन्म, वाढदिवस


  • १०७९ : गो-होरिकावा, जपानी सम्राट.
  • १८७५ : आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७९ : एमिलियो झपाता, मेक्सिकन क्रांतीकारी.
  • १८८० : अर्ल पेज, ऑस्ट्रेलियाचा ११वा पंतप्रधान.
  • १८८९ : जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०२ : पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०९ : बिल व्होस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२१ : वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.
  • १९२५ : अलिजा इझेत्बेगोव्हिक, बॉस्निया-हर्झगोव्हेनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३२ : दादा कोंडके, मराठी लोकप्रिय अभिनेते.
  • १९४० : दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५१ : फिल कार्लसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ : सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ : पॉल टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६५ : अँगस फ्रेझर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ : अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ : मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ : रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ८६९ : लोथार, लोथारिंजियाचा राजा.














No comments:

Post a Comment