Sunday, 24 July 2016

23 JUL HISTORY TODAY

२३ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २३ जुलै २०१३
२३ जुलै दिनविशेष(July 23 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

जागतिक दिवस


  • क्रांती दिन : इजिप्त.
  • हेल सिलासी जयंती : रासतफारी.

ठळक घटना, घडामोडी


  • १८४० : ऍक्ट ऑफ युनियनच्या अंतर्गत कॅनडा प्रांताची रचना.
  • १८७४ : एर्स दि ओर्नेलास इ व्हास्कोन्सेलोसची गोव्याच्या आर्चबिशपपदी नेमणूक.
  • १८८१ : चिली व आर्जेन्टिना मध्ये १८८१चा सीमा तह.
  • १९२९ : इटलीमध्ये परभाषेतील शब्द वापरण्यास बंदी.
  • १९४० : सोव्हियेत संघाने एस्टोनिया, लात्व्हिया आणि लिथुएनिया बळकावण्याबद्दल अमेरिकेने निषेध नोंदवला.
  • १९४२ : ज्यूंचे शिरकाण - त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध - ऑपरेशन एडेलवाइस ही मोहीम सुरू.
  • १९५२ : इजिप्तच्या राजा फारूकची उचलबांगडी.
  • १९६७ : डेट्रॉइटमध्ये दंगल. ४३ ठार, ३४२ जखमी.
  • १९६८ : क्लीव्हलँडमध्ये श्यामवर्णीय अतिरेकी व पोलिसांत धुमश्चक्री. तत्पश्चात पाच दिवस शहरात दंगल.
  • १९६८ : अल ऍलच्या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे रोममधून अपहरण.
  • १९७० : ओमानमध्ये राजकुमार काबूस इब्न सैदने आपल्या वडिल, सैद इब्न तैमूरला पदच्युत करून सत्ता बळकावली.
  • १९७२ : लँडसॅट १चे प्रक्षेपण.
  • १९८३ : एल.टी.टी.ई.ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला. जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार. १,००,००० नागरिकांनी भारत, युरोप आणि कॅनडात पलायन केले. येथून श्रीलंकेच्या नागरी युद्धाला सुरुवात झाली.
  • १९८३ : एर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ प्रकारच्या विमानाती इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.
  • १९९२ : जोसेफ रॅट्झिंगर (भविष्यातील पोप बेनेडिक्ट सोळावा) याच्या नेतृत्त्वाखालील समितीने जाहीर केले की समलिंगी व्यक्ती व लग्न न करता एकत्र राहणार्‍या व्यक्तींचे हक्क मर्यादित ठेवले पाहिजेत.
  • १९९२ : अबखाझियाने जॉर्जियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • १९९५ : हेल-बॉप धूमकेतूचा शोध.
  • १९९९ : ए.एन.ए फ्लाइट ६१ या विमानाचे टोक्यो येथून अपहरण.
  • २००५ : इजिप्तच्या शर्म अल-शेख शहरातील नामा बे भागात तीन बॉम्बस्फोट. ८८ ठार.

जन्म, वाढदिवस


  • ६४५ : यझिद पहिला, खलिफा.
  • १६४९ : पोप क्लेमेंट अकरावा.
  • १८५६ : बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.
  • १८६४ : अपोलिनारियो माबिनी, फिलिपाईन्सचा पंतप्रधान.
  • १८८६ : वॉल्टर शॉट्की, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९२ : हेल सिलासी, इथियोपियाचा सम्राट.
  • १८९९ : गुस्ताफ हाइनिमान, पश्चिम जर्मनीचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९०६ : चंद्रशेखर आझादभारतीय क्रांतिकारक.
  • १९०६ : व्लादिमिर प्रेलॉग, नोबेल पारितोषिक विजेता क्रोएशियाचा रसायनशास्त्रज्ञ.
  • १९१७ : लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री.
  • १९३१ : ते अतैरंगी काहू, न्यू झीलँडमधील राणी.
  • १९३६ : अ‍ॅन्थनी केनेडी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
  • १९५३ : ग्रॅहाम गूच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : ओमर एप्प्स, अमेरिकन अभिनेता.
  • १९७३ : मोनिका लेविन्स्की, व्हाइट हाउसमध्ये काम करणारी स्त्री.
  • १९७५ : सूर्य शिवकुमार, तमिळ अभिनेता.
  • १९७६ : ज्युडिट पोल्गार, हंगेरीची बुद्धिबळपटू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १८८५ : युलिसिस एस. ग्रँट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१६ : सर विल्यम रामसे, नोबेल पारितोषिक विजेता स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ.
  • १९२३ : पांचो व्हिया, मेक्सिकोचा क्रांतीकारी.
  • १९५१ : हेन्री पेटें, विची फ्रांसचा पंतप्रधान.
  • १९८५ : जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९९७ : वसुंधरा पंडित, भारतीय गायिका.
  • १९९९ : हसन तिसरा, मोरोक्कोचा राजा.
  • २००४ : मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता.
  • २००७ : मोहम्मद झहीर शाह, अफगाणिस्तानचा राजा.


















No comments:

Post a Comment