Thursday, 28 July 2016

26 JUL HISTORY TODAY

Today in Indian History
Events for July 26
26-July-1614Jahangir captured Mewar from Rana Amar Singh. A treaty was signed. In the Mughal court, Rana and his son were treated with exceptional courtesy.
26-July-1844Gooroodas Banerjee was born in Calcutta. He was a Judge of Calcutta High Court.
26-July-1874Rajarshi Shahu Chhatrapati, great revolutionary freedom fighter and social reformer, was born.
26-July-1891Rajendralal Mitra (Raja), famous Bengali ancient researcher, passed away.
26-July-1910Unrest flares up in the Deccan region of India. Demand grows for self-determination.
26-July-1922Girilal Jain, famous journalist and editor, was born.
26-July-1923Mukeshchandra Mathur, famous playback singer, was born.
26-July-1927Gulabrai Sipahahimalani Ramchand, cricketer (valuable all-rounder in 33 Tests for India), was born in Karachi.
26-July-1933Gandhiji went back to Sabarmati Ashram after his release from jail.
26-July-1956Godavarish Mishra, famous Oriya poet, playwright and essay writer, died.
26-July-1975Anti-government demonstrations held in Gujarat, defying the emergency law prohibiting such demonstrations.
26-July-1991Indian, UN Observer Mission in El Salvador joined. (ONUSAL - Jul 91 To Apr 95)
26-July-1991Tamil Nadu and Karnataka observe bandh over Cauvery water issue.
26-July-1993Swami Chinmayananda is named 1992 Hindu of the Year for a lifetime of dynamic service to Sanatana Dharma worldwide. He attained 'mahasamadhi' on July 26 at age 77.
26-July-1994Government rejects JPC report on securities scandal.
26-July-2000The Centre imposes a ban on employing children belowing 14 years as domestic servants by all Government employees in the All India services at the insistence of the NHRC.

२६ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २६ जुलै २०१३
२६ जुलै दिनविशेष(July 26 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
कारगिल युद्ध - कारगीलचे युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगील व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

जागतिक दिवस


  • राष्ट्रीय क्रांती दिन : क्युबा.
  • स्वातंत्र्य दिन : लायबेरिया, मालदीव.
  • विजय दिन : भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).

ठळक घटना, घडामोडी


  • ११३९ : अफोन्सो पहिला पोर्तुगालच्या राजेपदी.
  • १७८८ : न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.
  • १८४७ : लायबेरियाला स्वातंत्र्य.
  • १९३६ : जर्मनी व इतर मित्र देशांचा स्पॅनिश गृहयुद्धात हस्तक्षेप.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
  • १९४५ : युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
  • १९४७ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
  • १९४८ : हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
  • १९४८ : आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९५३ : क्युबन क्रांतीला सुरुवात.
  • १९५३ : अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यात मोर्मोन पंथाच्या फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स या बहुपत्नीत्त्व पाळणार्‍या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
  • १९५६ : जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
  • १९५७ : ग्वाटेमालाच्या हुकुमशहा कार्लोस कॅस्टियो अर्मासची हत्या.
  • १९५८ : अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
  • १९६३ : सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • १९६३ : युगोस्लाव्हियातील स्कोप्ये शहरात भूकंप. १,१०० ठार.
  • १९६५ : मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९७१ : अमेरिकेच्या अपोलो १५ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • २००५ : मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
  • २०११ : मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.

जन्म, वाढदिवस


  • १८७४ : शाहू महाराज, समाज सुधारक.
  • १०३० : संत स्टानिस्लॉ.
  • १६७८ : जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८०२ : मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५६ : जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक.
  • १८५८ : टॉम गॅरेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८७५ : कार्ल युंग, स्विस मनोवैज्ञानिक.
  • १९०८ : साल्व्हादोर अलेंदे, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२७ : जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२८ : फ्रांसिस्को कॉसिगा, इटालियन प्रजासत्ताकचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२८ : स्टॅन्ली कुब्रिक, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
  • १९३९ : जॉन हॉवर्ड, ऑस्ट्रेलियाचा २५वा पंतप्रधान.
  • १९४२ : व्लादिमिर मेचियार, स्लोव्हेकियाचा पंतप्रधान.
  • १९४३ : मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
  • १९४९ : थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
  • १९६९ : जॉँटी र्‍होड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ : खालेद महमुद, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ७९६ : ऑफा, मर्शियाचा राजा.
  • ८११ : निसेफोरस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १३८० : कोम्यो, जपानी सम्राट.
  • १४७१ : पोप पॉल दुसरा.
  • १८४३ : सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८६७ : ओट्टो, ग्रीसचा राजा.
  • १९५२ : एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
  • २००९ : भास्कर चंदावरकरमराठी संगीतकार.

















No comments:

Post a Comment